या बँकेने तिच्या विविध कार्यालयांसाठी सहायक पदासाठी 610 अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी देशव्यापी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड होईल. या पदांसाठी उमेदवार हे कुठल्याही शाखेतील पदवीधर असावेत. पदवी परीक्षेत त्यांना किमान 50 टक्के गुण मिळालेले असावेत. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट शिथिल आहे. याबरोबरच उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार हे पदवीधर असावेत किंवा मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी सेना दलात 15 वर्षे सलग सेवा केलेली असावी. ज्या राज्यातील पदासाठी उमेदवार अर्ज करु इच्छितात ते त्या त्या राज्याच्या भाषेत पारंगत असावेत.
या पदासाठी ऑनलाईन परीक्षा दि. 23 व 24 डिसेंबर, 2016 रोजी होईल. तर मुख्य परीक्षा जानेवारी, 2017 मध्ये होईल. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर, 2016 अशी आहे.
अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया बँकेच्या www.rbi.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
- देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती)(वृत्त)


Post A Comment:
0 comments: