संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत पदवीधर (कोणत्याही शाखेच्या) उमेदवारासाठी Combined Defense Services (CDS) परीक्षा दि. 05 फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे Combined Defense Services (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 18 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत CDS कोर्स क्र.53 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

सदर परिक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. 02 डिसेंबर 2016 अशी आहे. परिक्षेची जाहिरात दि. 09 नोव्हेंबर 2016 या तारखेच्या एम्प्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये आणि संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांची वेब साईट http//www.upsconline.nic.in वर प्रसिद्ध होणार आहे.

तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कार्यालय, मुंबई उपनगर येथे दि. 14 नोव्हेंबर 2016 रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येण्याआधी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेब साईट www.mahasainik.com वरील recruitment tab ला क्लीक करुन त्यामध्ये CDS-53 कोर्ससाठी उपलब्ध महत्त्वाच्या तारखा (important dates) व Check List सोबत असणारी सर्व परिशिष्टांचे अवलोकन करुन त्यांना डाउनलोड करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावेत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031 आणि 0253- 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.
Axact

Post A Comment:

0 comments: