वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित “शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटनानिमित्त पंतप्रधान श्री. मोदी यांचे आज या परिसरात आगमन झाले.त्यावेळी त्यांनी या परिसरातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिक ऊस क्षेत्राची पाहणी केली.
उसाच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाविषयी, नवीन बियाण्यांविषयी, खतांविषयी पंतप्रधान श्री. मोदी यांनी माहिती घेत अत्यंत बारकाईने सर्व प्लॉटची पाहणी केली. ऊस पिकाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी श्री. मोदी यांनी संस्थेच्या संशोधकांकडून माहिती घेतली.यावेळी त्याच्यासोबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट,संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख उपस्थित होते.या परिषदेच्यानिमित्त परिसरात लावण्यात आलेल्या ऊस प्रात्यक्षिक क्षेत्रामुळे हा परिसर हिरवागार दिसत होता.


Post A Comment:
0 comments: