याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर,पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये साखर उद्योगाशी निगडीत १८२ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, कॅनडा, बेल्जियम या चार देशासह देशातील उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली आदी राज्यातील साखर उद्योगांशी निगडीत संस्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.तसेच राज्यातील महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राज्यातील चार कृषी विद्यापीठे तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व अन्य संबंधित संस्थांचे ऊस उत्पादन व वाढीशी निगडीत स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत.


Post A Comment:
0 comments: