दत्तात्रय हरिभाऊ आढाव (वय २६, रा. काळेवाडी) असे कोठडी सुनाविलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वरुप बाळकृष्ण सांगळे (वय २३, रा. गवळीवाडा कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी इन्फोसिस बीपीओ. लि. कंपनी हिंजवडी येथे घडली.
आरोपी आणि फिर्यादी हे इन्फोसिस कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. कंपनीने फिर्यादी सांगळे यांना ग्राऊंड फ्लोअरवरील वॉशरुममध्ये दिलेल्या लॉकरमध्ये फिर्यादीने त्यांचा मोबाइल ठेवला होता. आरोपीने लॉकर उघडनूा मोबाइल चोरला व पुन्हा लॉकर बंद केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस विश्वासात घेऊन तपास करावयाचा असल्याने त्यास पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली, ती न्यायालयाने ग्राह्य धरली.


Post A Comment:
0 comments: