शिरूर : शहर विकास आघाडीचे प्रमुख रसिकलाल धारिवाल यांनी आज आपली सून दीना धारिवाल या आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणार नाहीत, असे जाहीर केल्याने आघाडीच्या उमेदवारीबाबत पुन्हा साशंकता निर्माण झाली आहे. धारिवाल यांचा शब्द जिथे प्रमाण मानला जातो त्यांनी अध्यक्षपदाचा निर्णय आमदार व दोन माजी आमदारांवर सोपवला.
या तिघांनी या निवडप्रक्रियेचे अधिकार प्रकाश धारिवाल यांना दिले. यामुळे आता उमेदवार कोण, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आघाडीचे प्रमुख धारिवाल यांच्याकडे गेल्या १0 वर्षांपासून उमदेवार निश्चितीचे अधिकार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी ते संपूर्ण सक्रिय नाहीत. मात्र शहर व पंचक्रोशीच्या नागरिकांनी त्यांच्या सुनेला उमेदवारी देण्याची मागणी करणार्या प्रस्तावाला धारिवाल यांनी आज येथे नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, ''तुमचे आमच्या कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. मात्र वैयक्तिक अडचणीमुळे आम्हाला सुनेची उमेदवारी देणे शक्य होणार नाही.
दीना धारिवाल यांनाच उमेदवारी द्यावी, यामुळे शहरातून कोणीच नगराध्यक्षपदासाठी आघाडीकडे उमेदवारी मागितली नाही. धारिवाल यांच्या निर्णयामुळे मात्र आता कोणाला उमेदवारी मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता असेल. धारिवाल यांनी सुनेची उमेदवारी नसल्याचे सांगितल्यावर नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी दीना धारिवाल यांनाच उमेदवारी द्यावी, या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी सर्वांसमोर विनंती केली. मात्र धारिवाल यांनी यावर भाष्य केले नाही. काही इच्छुकांनी तर दीना धारिवाल यांची उमेदवारी नसेल तर आम्हाला लढायचे नाही, असा पवित्रा घेतला.
आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले, ''गेल्या दहा वर्षांत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. धारिवाल कुटुंबाचे गावाप्रती असलेले योगदान पाहता आम्ही सर्व नेत्यांनी एकत्र चर्चा केली आहे. निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार प्रकाश धारिवाल यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.'' माजी आमदार अँड. अशोक पवार यांनीही अशीच भूमिका जाहीर केली. प्रकाश धारिवाल म्हणाले, ''मागील दहा वर्षे सर्वांनीच आघाडीला सहकार्य केले. पुढील पाच वर्षेही असेच सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे.'' माजी आमदार पोपटराव गावडे, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, आघाडीचे नेते माऊली पठारे, प्रभाकर डेरे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, शहराध्यक्ष जाकिरखान पठाण, माजी अध्यक्ष संतोष भंडारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल काशीद आदींसह नगरसेवक, तीनही पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उपस्थित होते.
समाजात ज्याची चांगली प्रतिमा आहे तो गावाला बरोबर घेऊन चालेल, समतोल राखेल, अशाच व्यक्तीला आघाडीतर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली जाईल, असे धारिवाल यांनी स्पष्ट केले. जागा २१ व इच्छुक १२१ उमेदवार निवडीची कसरत आहे. मात्र ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Post A Comment:
0 comments: