हडकसिंग ऊर्फ खडकसिंग जलसिंग पांचाळ (वय ३८, रा. कोटा, ता. राहता, जि. हमीपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून व अनैसर्गिक बलात्काराच्या गुन्ह्यात तो आरोपी होता.
आरोपी हडकसिंग याने चाकण येथील एका पाचवर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करीत त्याचा खून केला होता. त्याला २0१३ मध्ये अटक करून न्यायालयाने कारागृहात पाठविले होते. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान त्याने २0११ मध्ये अशाच प्रकारचे आणखीही गुन्हे केल्याचे समोर आले होते.
दरम्यान, खेड सत्र न्यायालयाने त्याला २२ सप्टेंबर २0१६ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे कुटुंबीय मूळ गावी राहण्यास असून, ते त्याला भेटायला येत नसत. शुक्रवारी पहाटे त्याने अठरा नंबर खोलीतील लाकडी खुंटीला कापडाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.


Post A Comment:
0 comments: