जिल्ह्यातील १४ डिसेंबर रोजी १0 नगरपालिकांच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, शुक्रवारी अधल्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. गुरुवारपर्यंत वातावरण थंड होते. मात्र आजपासून राजकीय वातावरण तापू लागले आहे.
शिरूरमध्ये आमदारांनी विकास आघाडीसोबत लढण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार भाजपच्या उमदेवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय खेळीविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर दौैंडमध्ये एक वेगळाचा फॉर्म्युला समोर आला आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी इंदापूरमध्ये मित्रपक्षांना एकत्र करून सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची घोषणा केली आहे.
तर सासवडमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात दोन दिवसांपूर्वी लोकमित्र जनसेवा आघाडी करण्यात आली होती.
मात्र, मनसेने सासवड व जेजुरीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. १ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून, त्यानंतर नगरपालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, प्रचाराच्या तोफा सुरू होणार आहेत.

Post A Comment:
0 comments: