संमिश्र


no image
सातारा : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम होती घ्यावी. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिले.

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक-2016 अंतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विभागीय आढावा बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. सहारिया बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस.पी.एस. यादव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आदी उपस्थित होते.

या चार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकीचे कामकाज योग्य दिशेने चालले असल्याचे सांगून श्री. सहारिया म्हणाले, नगरपरिषदांच्या निवडणुकीत 70 टक्के मतदान होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करा. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये मेळावे, रॅली, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड येथे भितीपत्रके चिकटवून व होर्डींग लावून जनजागृती करावी. या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून पैसे, मद्य तसेच इतर वस्तूंचे वाटप करण्यात येते, त्यावर निवडणूक निरीक्षकांनी तसेच पोलीस विभागाने गस्त वाढवून अशा वाटपावर अंकुश ठेवावा. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली भूमिका काय आहे हे समजावून घ्यावे. सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच उमेदवारांकडून 30 दिवसाच्या आत खर्चाचा तपशील घेवून तो योग्य आहे किंवा नाही हे तपासावे. कोणताही अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात कुचराई करत असेल त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री.चोक्कलिंगम म्हणाले, सर्व पक्षांकडून तसेच उमेदवारांकडून वेळेत खर्च घ्यावा. कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या. 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा वापरातून बंद केल्या आहेत. त्या नोटा निवडणुकीच्या काळात वापरता येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कुठलाही उमेदवार प्रलोभन देत असेल अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करा. सोशल मीडियाद्वारे कुणी अफवा पसरवत असेल अशा व्यक्तींवरही कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. चन्ने म्हणाले, वोटर स्लीपचे जास्तीत जास्त वाटप करा. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होते. वोटर स्लीप वाटण्याची जबाबदारी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची आहे. आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा म्हणजे तक्रारी कमी येतील. विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना राबवा. ज्या शस्त्रधारकांवर गुन्हे नोंद आहेत. अशा शस्त्रधारकांचे शस्त्र जमा करुन घ्यावे. पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदान समानतेने वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

श्री.यादव म्हणाले, नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी पोलीस विभागामार्फत सर्व मदत केली जाईल.

श्री.नांगरे-पाटील म्हणाले, नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात करण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार व पोलीस अधीक्षक विरेश प्रभु, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पोलीस अधीक्षक प्रभारी महादेव तांबडे व सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी निवडणुकविषयी कामकाजांच्या उपाययोजनांची माहिती दिली.


मुंबई : दहशतवादाचा बिमोड करणे हे आज जगापुढील आव्हान आहे, मात्र दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायल भारतासोबत खांद्याला खांदा लावून प्रयत्न करेल, असे प्रतिपादन इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन यांनी येथे केले.

श्री.रिवलिन यांचे आठवडाभराच्या भारत दौऱ्‍याच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत आगमन झाले. त्यानिमित्त हॉटेल ताज येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.रिवलिन यांच्या पत्नी श्रीमती नेचामा रिवलिन, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी 26/11 च्या हल्ल्यात हॉटेल ताज येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री.रिवलिन म्हणाले, दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत व इस्त्रायल एकदिलाने काम करतील. इस्त्रायल ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांत सक्रिय सहभागी होत भारताला औद्योगिक विकासाच्या वाटचालीत मदत करणार आहे.

यावेळी राज्यपाल श्री.राव म्हणाले, देशाच्या विकासात ज्यू समाजाचे मोठे योगदान आहे. 26/11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यास शब्दही कमी पडतात. मुंबईतील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांनी तीन दिवस या हल्ल्याला निर्भयपणे तोंड दिले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलच्या सहकार्याने ही कामगिरी निश्चित यशस्वी होईल.
                     
नरिमन हाऊस येथे प्रार्थना

यावेळी श्री.रिवलिन यांनी नरिमन हाऊस येथे भेट दिली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊस येथे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली व उपस्थितांनी प्रार्थना म्हटली.


इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्षांना लेझिमची भुरळ

इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्षांच्या यांच्या आगमनप्रसंगी विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांचे दर्शन घडविणारा छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्ष श्री. रिवलिन यांनाही लेझिम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कलाकारांसमवेत लेझिम हातात घेऊन ताल धरला. श्री.रिवलिन यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांची पाठ थोपटत दाद दिली.


विधान सभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केल्यानंतर बाजार समितीवर आमदार दत्तात्रय भरणे यांनी वर्चस्व मिळविले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल च्या माध्यमातून काँग्रेस पुरस्कृत कर्मयोगी शंकरराव पाटील शेतकरी विकास पॅनलला आव्हान दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सतरा वर्षांनी पहिल्यांदाच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. काल या निवडणुकीसाठी ९८.७३ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते.आज सकाळी नऊ वाजता शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली.प्रारंभापासून काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलमध्ये अगदी घासून लढत चालली होती.दुपारी दीड वाजता कल येण्यास सुरुवात झाली.सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने चार तर काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतली.मात्र काँग्रेसला नंतर ती टिकवता आली नाही.

सात पैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या.त्यानंतर व्यापारी आडतदार मतदार संघ,हमाल तोलार मतदार संघ,ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ,कृषी प्रक्रिया मतदार संघ यातील एकट्या दुकट्या जागा जिंकत काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानावे लागले.सर्वसाधारण मतदार संघात प्रवीण काळे,दत्तात्रय फडतरे,इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघात काँग्रेसचे कांतीलाल झगडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेशकुमार झगडे व ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्यासाहेब वडापूरे,व काँग्रेसचे रोहित मोहोळकर यांच्यामधील काट्यावरच्या लढतीत फेरमतदानाची मागणी करण्यात आली.त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फडतरे व झगडे यांना त्याचा फायदा मिळाला.वडापूरे यांना पराभवाशी सामना करावा लागला.या ठिकाणी फडतरे यांना एका मताने तर गणेशकुमार झगडे यांना दोन मतांनी विजय मिळाला.या सर्व प्रकारामध्ये निवडणूक निकाल सात वाजून पन्नास मिनिटांनी जाहीर झाला. (वार्ताहर) बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. निवडणुकीत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रयत पॅनलने सर्व १३ जागा जिंकून पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलचे ६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे सर्व जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कुंभार यांनी हा निकाल घोषित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील वसंतराव पवार, नारायण महादेव कोकरे, पुरुषोत्तम तुकाराम गदादे, प्रताप मधुकर सातव, नितीन शंकर सरक, अनिल धोंडिबा हिवरकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले, की आजचा विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांसाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. युतीचे शासन शेतकरीविरोधी आहे. युती शासनाने घेतलेल्या विविध निर्णयामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारला चपराक म्हणून हा विजय मिळाला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर दाखविलेला हा विश्‍वास आहे.
तसेच, या निकालाबाबत भाजपा नेते पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, की बाजार समितीचा निकाल अपेक्षित होता. जिल्हा बँकेशी संबंधित संस्थांवर पवारांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतदार निवडक आहे. हे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षांचे मतदार आहेत. आम्हाला मिळालेली मतेदेखील चांगली आहेत.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा सर्वस्वी गोरगरीब जनतेचा मतदारांचा आहे. निवडणूक अटीतटीची होती. सहकारी संस्था मतदारसंघात बोगस संस्थांचा समावेश होता. त्याबाबत विरोधक वेगवेगळी वक्तव्ये करीत होते. त्यांच्याकडून खालच्या पातळीवर प्रचार झाला. अजित पवारांवर वैयक्तिक टीका करणे खेदजनक होते.
- दत्तात्रय भरणे, आमदार 

हा प्रामाणिकपणाचा विजय आहे. काम झाल्यावर आम्ही लोकांना कधीही वार्‍यावर सोडले नाही. कोणाचेही काम करताना एक रुपयामध्येही मिंधे झालो नाही. चांगल्या पद्धतीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करण्यासाठी संधी मिळाली आहे. विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांना मतांद्वारे मतदारांनीच उत्तर दिले आहे.
- अप्पासाहेब जगदाळे, नवनिर्वाचित संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती विजयी उमेदवार
निर्मला अंकुश रणमोडे (१५९८ )
गणेशकुमार कृष्णा झगडे (१५४९)
 शिवाजी सत्यवान इजगुडे (१५६९)
आबा गणपत देवकाते (५६१ )
 यशवंत विठ्ठल माने (६२३)
 सचिन आगतराव देवकर (५८६)
मेघश्याम वामनराव पाटील ( ३0२)
 सुभाष ज्ञानदेव दिवसे (४0)
भानुदास खंडेराव सपकळ (१३ ).