महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक, गट- ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 181 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा-2016 रविवार, दि. 29 जानेवारी, 2017 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यातील केंद्रांवर घेण्यात येईल. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विक्रीकर निरीक्षक, गट ब (अराजपत्रित) या पदासाठी एकूण 181 पदे असून त्यापैकी अनुसूचित जाती- 21, अनुसूचित जमाती- 6, वि.जा.(अ)-7, भ.ज. (ब)-3, भ.ज. (क)-11, भ.ज. (ड)-1, इ.मा.व.-28, एकूण मागासवर्गीय- 77, खुला-104 अशी पदे आहेत.

या पदासाठी उमेदवाराचे वय दि. 01 फेब्रुवारी, 2017 रोजी वय किमान 18 वर्षे असावे व कमाल 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथीलक्षम आहे. प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथीलक्षम आहे. माजी सैनिक, आणिबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथीलक्षम आहे. विकलांग उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत आहे तर विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

या पदासाठी उमेदवार हा सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतूल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता धारण केलेला असावा. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2016 च्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2016 करिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. आंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांनी सदर अट मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

या पदासाठी नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. या पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर, 2016 असा आहे. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

पत्ता-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
5,1/2, 7 व 8 वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षि कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई- 400 021
दूरध्वनी क्र. 22795900, फॅक्स-22880524
ईमेल- sec.mpsc@maharashtra.gov.in

-देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(वृत्त)
Axact

Post A Comment:

0 comments: