नागपूर :
नोटा बंदीच्या निर्णयाने कामाचा ताण असह्य झाल्यामुळे येथील स्टेट बँकेच्या शाखेत कॅशियरचा केबिनमध्येच हार्टअँटॅकने मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू (५0) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत रामपंतलू कस्टमर असिस्टंट या पदावर कार्यरत होते. नोटा बंदीमुळे बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून बँकेत ग्राहकांची झुंबड उडाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची अक्षरश: त्रेधातिरपट उडत आहे. दैनंदिन व्यवहार सांभाळतानाच संतप्त ग्राहकांची समजूत घालण्यातही बँकेचे अधिकारी, कर्मचारी गुंतले आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले काम आणि प्रचंड दडपण यामुळे अनेक कर्मचार्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. रामपंतलू राजू यांच्याबाबतही काहीशी अशीच स्थिती झाली होती. प्रचंड तणावाखाली असलेले रामपंतलू शुक्रवारी सकाळी गांधीनगर शाखेत हजर झाले. त्यांना कॅश काऊंटरवर बसविण्यात आले होते. सकाळी ११ पासून त्यांना अस्वस्थ वाटत होते, मात्र पाण्याचा घोट घेत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.
Axact

Post A Comment:

0 comments: